आपल्याला आपली ऑनलाइन विक्री वाढवू इच्छित असल्यास किंवा आपल्या ग्राहकांचे फोन कॉल घेऊ इच्छित असल्यास किंवा वेबसाइटची रहदारी वाढवू इच्छित असल्यास महास्वराज्य व्यापर आपल्याला अधिक ग्राहक मिळविण्यात मदत करेल.
आपण बी 2 बी, बी 2 सी, एजंट, लघु व्यवसाय मालक, किरकोळ विक्रेता, घाऊक विक्रेता, कंपनी किंवा उद्यम असलात तरी, महास्वराज्य व्यापार आपल्याला व्यवसायाच्या वाढीसाठी लक्ष्यित ग्राहक शोधण्यात मदत करते.
महास्वराज्य व्यापारावर नोंदणी केलेल्या सर्व व्यवसाय हे नि: शुल्क आहेत की देय आहेत तसेच ते व्यवसाय खरे आणि कार्यरत आहेत का हे पडताळून सत्यापित केले आहेत.
महास्वराज्य व्यापार हे आपल्याला व्यवसाय निगडित असणारे मागणीदार व पुरवठादार तसेच इतर व्यवसायांशी जोडण्याचे काम करते
आपल्या शहरात, खेड्यात किंवा राज्यात, आपण महास्वराज्य व्यवसायाद्वारे सहजपणे आपल्या व्यवसायाची जाहिरात करू शकता आणि ग्राहकांपर्यंत पोहोचु शकता, परिणामी आपले ग्राहक आपल्याला सहज शोधू शकतील.
महास्वराज्य व्यापर ही एक उत्तम आणि वेगाने वाढणारी भारतीय व्यवसाय निर्देशिका आहे, जी दर्जेदार व्यवसाय व्यासपीठ हे व्यवसाय मालकांना देते आणि त्यांचा महसूल वाढविण्यात मदत करते.
महास्वराज्य व्यापार वेबअँप ही महाराष्ट्रतील एकमेव व्यवसाय निर्देशिका ( बिझनेस डायरेक्टरी ) वेबसाईट आहे जी महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या व्यवसाय बद्दलची संपूर्ण माहिती महाराष्ट्रात राहत असलेल्या ग्राहकांपर्यंत पोचाविन्याचे काम करते. महाराष्ट्रातील व महाराष्ट्र बाहेरील सर्व मराठी उद्योजक व त्यांचा व्यवसाय यासाठी इंटरनेट माध्यमातील महास्वराज्य व्यापर हे एक स्वतंत्र व्यासपीठ आहे.
महाराष्ट्रातील मराठी उद्योजक व त्यांचे व्यवसाय यांची वाढ व्हावी, तसेच थांबलेल्या मराठी उद्योगांना चालना मिळावी, तसेच नविन उद्योग सुरु करू पाहणाऱ्या मराठी बांधवांसाठी त्याच्या भागात नसलेले नवनवीन उद्योग विषयी माहिती व मार्गदर्शन देण्याच्या हेतूने महास्वराज्य व्यापर या वेबअँप ( वेबसाईट) ची निर्मिती करण्यात आली आहे.
महास्वराज्य व्यापर वेबअँप ही संकल्पना आयती क्षेत्रात कामकरणाऱ्या मराठी आयटी संस्थे मार्फत आपल्या महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्र बाहेरील मराठी उद्योजक याच्या व्यापार वाढीसाठी तसेच नवे उद्योजक घडविन्याच्या उद्देशाने उभारली असून त्याची सुरुवात ही दि. २५-१२-२०२२ रोजी (शके १९४४, मार्गशीर्ष ) श्रीदत्तजयंती या शुभ मुहुर्ती झाली आहे.
महास्वराज्य व्यापर वेबअँप यामध्ये येणाऱ्या प्रत्येक मराठी उद्योजकाला त्याच्या व्यवसाय संदर्भातील सर्व प्रकारची माहिती उदा. उद्योगाचा प्रकार, वस्तु व सेवांची माहिती, व्यवसायाचे फोटो, पत्ता, मोबाइल नंबर, तसेच गूगल मॅप वरील ठिकाण असे आणखी बरेच काही इ. माहितीचा तपशील वेबपेज वरुन इंटरनेट मार्फत ग्राहकां पर्यंत पोहोचविने सोपे होते. या सोयीमुळे व्यवसायासाठी लागणारे ग्राहक, मराठी व्यापारी, कच्चा मालाचे व्यापारी तसेच त्या संबधित असणाऱ्या मराठी व्यवसायिकांची माहिती ही एकाच ठिकाणी मिळते. परिणामी मराठी उद्योजक, व्यापारी, कारखानदार, तसेच ग्राहक यांच्यामार्फ़त होणाऱ्या व्यवसायाचा फायदा हा आपल्या महाराष्ट्रातील मराठी व्यक्तिला व अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राला होईल.
महास्वराज्य व्यापर वेबअँप ही संकल्पना महाराष्ट्रातील केवल एका जातीच्या लोकांसाठी नसून महाराष्ट्रामध्ये पिढीजात राहत आलेल्या प्रत्येक मराठी बांधवासाठी आहे. महास्वराज्य व्यापर ही संकल्पना कोणत्याही एका राजकीय पक्ष, धार्मिक संस्था, वैयक्तिक जाती संबधित निगडित नसून ती फक्त आणि फक्त महाराष्ट्रात व महाराष्ट्र बाहेर राहणाऱ्या प्रत्येक मराठी व्यक्ति, मराठी उद्योजक व ग्राहक यांच्यासाठी आहे.
महास्वराज्य व्यापार वेबअँप निर्देशिका मध्ये आपल्याला आपल्या जवळ असणारे विश्वासु विक्रेते, स्थानिक व्यवसाय, उपहारगृहे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसायांबद्दल सर्व माहिती (नाव, पत्ता, फोन नंबर, उत्पादने, सेवा) आणि बरेच काही सहज सापडेल अशी तरतूद या मध्ये करण्यात आली आहे.
महास्वराज्य व्यापार वेबअँप या ऑनलाईन व्यवसाय निर्देशिकेद्वारे स्थानिक व्यवसायांना त्यांचे ग्राहक आणि ग्राहकांना मराठी व्यवसाय सुलभरित्या शोधता यावे आणि त्यासाठी लागणारी कार्यशैली अधिक उपयुक्त बनविणे हे आमचे लक्ष्य आहे. तसेच, या निर्देशिकेत आमच्या ग्राहकांना स्थानिक व्यवसाय आणि त्यांच्या स्थानिक क्षेत्राशी संबंधित सखोल व्यवसायाची माहिती एकाच ऑनलाइन व्यासपीठावर उपलब्ध करने आवश्यक असून महास्वराज्य व्यापारची टीम यावर अखंड कार्यरत आहे.