” महास्वराज्य व्यापार ” ही एक ऑनलाइन व्यवसाय निर्देशिका आहे जी महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्रा-बाहेर राहणारे मराठी व्यावसायिक व मराठी ग्राहक यांना जोडण्याचे काम करते.
” महास्वराज्य व्यापार ” या एक ऑनलाइन व्यवसाय निर्देशिके मध्ये फक्त मराठी व्यापारी/ व्यावसायिक बांधवांकडूनच त्यानी निवडलेल्या योजने (प्लान) प्रमाणे असलेली फी आकारली जाते. व्यापारी /व्यावसायिक वर्गासाठी निवडक योजना सोडल्यास इतर कोणत्याही ग्राहक तसेच व्यापारी वर्गाकडून महास्वराज्य व्यापर कोणत्याही प्रकारची फी आकराली जात नाही.
” महास्वराज्य व्यापार ” या ऑनलाइन व्यवसाय निर्देशिके मध्ये फक्त मराठी व्यापारी/ व्यावसायिक वर्गाकडूनच त्यानी निवडलेल्या योजने (प्लान) प्रमाणे आकारलेल्या फीच्या बदल्यात त्याना व्यवसाय वाढीसाठी उपयुक्त अशा निगडित ऑनलाइन सेवा दिल्या जातात.
” महास्वराज्य व्यापार ” व्यवसाय निर्देशिका ही महाराष्ट्रातील कोणत्याही एका जाती किंवा समाज पुरता मर्यादित नसून ती महाराष्ट्रातील मूळ स्थानिक रहिवासी व ज्यांचीमातृभाषा मराठी आहे अशा सर्वांना आम्ही महाराष्ट्रातील मराठी माणूस समजतो आहे, अशा सर्वांसाठी बनवली गेली आहे. याद्वारे कोणत्याही प्रकारचा जातीवाद, प्रांतवाद, समाजवाद तसेच उत्तेजनार्थ, हिंसक, ताणतणाव परिस्थिती निर्माण व्हावी अशी भावना नाही. तसेच अश्या गोष्टींना महास्वराज्य व्यापार समर्थन करीत नाही व भविष्यात कधीही भेदभाव करणार नाही ज्याने भारतीय संविधानातील कायदा व सुव्यवस्था मोडले जातील.
” महास्वराज्य व्यापार ” ही कोणत्याही प्रकारची ” लॉटरी/ स्कीम देणारी ” किंवा ” पैश्याची देवाण घेवाण ” करणारी ” फसवणुक करणारी व्यवस्था ” नाही.
” महास्वराज्य व्यापार “, “महास्वराज्य ग्रुप ” व “ महास्वराज्य ” संबधित असलेल्या या व्यक्ती/ संस्था कुठल्याही प्रकारच्या ठेवी स्वीकारत नाहीत, तसेच कुठल्याही प्रकारची गुंतवणूक रक्कम वेबसाइट तसेच इतर कोणत्याही माध्यमातून व्यापारी व ग्राहकांकडुन घेत नाही व कोणत्याही प्रकारचे परताव्याचे आश्वासन ग्राहकास किंवा व्यापारी वर्गास दिले जात नाही.
” महास्वराज्य व्यापार ” व्यवसाय निर्देशिका ही ” माहिती-दर्शक ( INFOTAINMENT) ” या प्रकारामधील असून त्या मधे व्यापारी व ग्राहक याची वैयक्तिक व व्यवसाय विषयक पुरेशी माहिती पडळूतान घेतली जाते. तसेच व्यापारी वर्गाने त्यांनी दर्शविलेल्या त्यांच्या वेबपेज वरील वस्तु व सेवा तसेच किंमतीशी ‘’ महास्वराज्य व्यापारचा “ काहीही संबध नाही.
ग्राहकांनी ” महास्वराज्य व्यापार ” व्यवसाय निर्देशिकेतील कोणत्याही व्यावसायिका सोबत आर्थिक व्यवहार हा स्व:मताने सर्व खात्रीशिर, डोळे उघडे ठेऊन करावयाचा आहे. तुम्ही केलेल्या व्यवहारामध्ये तुमचे कोणतेही आर्थिक नुकसान किंवा वादग्रस्त परिस्थिति निर्माण झाल्यास त्यासाठी ” महास्वराज्य व्यापार “, “महास्वराज्य ग्रुप ” व “ महास्वराज्य ” संबधित असलेल्या व्यक्ती/ संस्था किंवा आमचे सहकारी कोणीही जबाबदार नसतील.
” महास्वराज्य व्यापार ” ही व्यवसाय निर्देशिका व्यावसायिक आणि ग्राहक यांना जोडणाऱ्या दुवा प्रमाणे काम करीत असल्याने पुढील सर्व व्यवहार ग्राहकाने स्व:ताच्या जबाबदारीवर करने अशी आम्ही विनंती करतो. तसेच एखाद्या व्यवसायाबद्दल जर ग्राहकाला आपले मत / अभिप्राय नोंदावायचा असेल तर निःसंकोच पणे मत नोंदविण्याचे अधिकार ग्राहकाला दिले आहेत.
कोणत्याही परिस्थितीमधे ग्राहकाला, व्यवसायिकाला तसेच महास्वराज्य व्यापरचा भाग असलेल्या कोणत्याही व्यक्तीस संपूर्ण निर्देशिकेमध्ये तसेच अभिप्राय व इतर कोणत्याही ठिकाणी अश्लील, वादग्रस्त भाषा, शब्द प्रयोग वापरण्यावर पूर्णतः बंदी असेल. असे करणारा पोलिस कारवाईस पात्र असेल.
ग्राहकांसाठी “ महास्वराज्य व्यापर “ हे मोफत असल्याने आम्ही विनामुल्य सेवा ग्राहकांना तसेच नविन लघु व्यावसायिकासाठी देतो व योजना घेऊ इच्छिणाऱ्या व्यापारी वर्गासाठी नियमानुसार ठरवून दिलेल्या एका विशिष्ठ सुरक्षित ऑनलाइन पद्धतीने फी आकारतो व त्याप्रमाणे त्याची पावती सुद्धा दिली जाते. या व्यतिरिक्त कोणताही इतर ऑफलाइन मार्गाने पैश्याची व्यवहारे “ महास्वराज्य व्यापर “ करीत नाही.
“महास्वराज्य व्यापार”, “महास्वराज्य ग्रुप” व “महास्वराज्य” हे नाव वापरून किंवा स्व:ताला महास्वराज्य समूहाचा सहकारी/ अधिकारी /स्वयंसेवक असे सांगुन एखादी व्यक्ति जर तुमच्या कडून पैश्याची मागणी करत असेल तर कृपया अश्या फसवेगिरिला / अमिशाला बळी पडू नये. असा काही प्रकार घडल्यास “महास्वराज्य व्यापर“ त्यास जबाबदार राहणार नाही.
” महास्वराज्य व्यापार “, “महास्वराज्य ग्रुप ” व “ महास्वराज्य ” संस्था ही कोणत्याही शासकीय, निमशासकीय विभागाशी सलग्न नसून ती एक स्वतंत्र संस्था आहे. तसेच ही संस्था कोणत्याही राजकीय, सामाजिक, जातीय, धार्मिक पंथ किंवा पक्षाला समर्थन देत नाही व सलग्न सुद्धा नाही.
आम्ही काही संगणक अभियंता ( कम्प्युटर इंजिनीअर ) मिळून एक विचार, स्वप्न, व धेय्य सोबतीला घेउन आपल्या ज्ञानाचा चांगला उपयोग आपल्या मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी व्हावा या दृष्टिकोणाने प्रेरित होउन “ महास्वराज्य व्यापर “ या व्यवसाय निर्दार्शिके मार्फ़त कार्य करीत आहोत.
व्यासायिकांनी निवडलेल्या देय योजने ( पेड प्लॅन ) साठी भरत असलेली फी ही आमच्या देय सेवा ( पेड सर्विस ) चा वापर करण्याबद्दल असुन ती संपूर्णपणे “नॉन रिफंडेबल” अर्थात “परत न करण्य़ायोग्य” आहे याची नोंद घ्यावी.
व्यासायिकांनी हे लक्षात घ्यावे की निवडलेल्या (पेड प्लॅन) सशुल्क योजनेसाठी व ठराविक कालावधिसाठी दिलेली फी ही आमच्या देय सेवा ( पेड सर्विस ) वापरण्यासाठी आहे आणि ती पूर्णपणे “ न-परतावी ( नॉन-रिफंडेबल ) “आहे म्हणजे ती फी अथवा शिल्लक असलेल्या कालावधीची फी परत केली जाणार नाही.
कोणत्याही अधिक माहितीसाठी आमचा ईमेल आयडी vyapar.care@vyapar.mahaswarajya.com .