- महास्वराज्य व्यापर ही व्यवसाय निर्देशिका (बिजनेस डायरेक्टरी) फक्त अणि फक्त महाराष्ट्र अणि महाराष्ट्रा-बाहेरील मराठी व्यापारी बांधव व ग्राहक यांना जोडण्याच्या हेतूने तयार केली गेली असून त्यामधे नोंदणी करणारे प्रत्येक व्यावसायिक व ग्राहक (वापरकर्ते) हे मराठी तसेच महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राचे मुळ रहिवासी असावेत.
- महास्वराज्य व्यापर मध्ये नोंदणी करण्यासाठी व्यवसाय मालकाला तसेच ग्राहकाला/ वापरकर्त्याला आपण महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा आणि मराठी असल्याच्या पुरावा दर्शाविनारे दाखले देणे बंधनकारक असेल, त्यासाठी लागणारे दाखले खालील प्रमाणे..
स्थानिक पुरवा :– शाळा सोडल्याचा दाखला किवा जातीचा दाखला.
ओळखपत्र :– ( आधार कार्ड / पॅन कार्ड यापैकी एक )
रहिवासी पुरावा :– ( आधार कार्ड / वाहन चालक परवाना/ विज बिल यापैकी एक )
फोटो :– ( स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो )
महास्वराज्य व्यापर मध्ये नोंदणी करण्यासाठी तुम्हाला आधी महास्वराज्य ओळख पोर्टल ( MahaSwarajya Identity Portal) वर नोंदणी (Registration/रजिस्ट्रेशन) करणे बंधनकारक आहे. या महास्वराज्य ओळख पोर्टल मध्ये प्रतेक वापरकर्त्याला एक युनिक (Unique) नंबर म्हणजेच महास्वराज्य ओळख क्रमांक ( MSIN ) दिला जाईल.
- महास्वराज्य ओळख क्रमांक ( MSIN ) हा प्रत्येक मराठी वापरकर्त्यास महास्वराज्य व्यापार मध्ये नोंदणी करण्यासाठी अनिवार्य आहे.
- नोंदणीदाराने ओळख•महास्वराज्य•कॉम (olakh.mahaswarajya.com)
- या ऑनलाइन संकेत स्थळावर जाऊन आपली वैयक्तिक खरी माहिती व कागदपत्रे डिजिटल (सॉफ्टकॉपी /फोटो ) स्वरूपात भरावयाची आहे.
- नोंदणी करते वेळी जर काही कागदपत्रे किंवा माहिती बद्दल अडचण किवा अधिक माहिती पाहिजे असल्यास आम्हाला किंवा आमच्या स्थानिक प्रतिनिधीला संपर्क करा.
- नोंदणीदाराची माहिती व कागदपत्रे यांमधे काही त्रुटी आढळून आल्यास आम्ही आपल्या कडे काही अधिक ची माहिती कागदपत्रे मागणी केल्यास आपल्याला ती पुरविणे बंधनकारक असेल.
- आम्ही महास्वराज्य व्यापर कोणत्याही वापरकर्त्यांकडून बँक संदर्भातील खालील पैकी माहितीची मागणी करत नाही. तसेच अधिकची माहिती पुरवत असताना नोंदणीदाराने कोणतीही वैयक्तिक बँकेची माहिती उदा. बँक खाते नंबर, बँकेचे पासबुक, तसेच बँके मार्फ़त आलेले ओ. टी. पी. व बँक गोपनीय पासवर्ड कोणत्याही व्यक्तीला, आम्हाला किवा आमच्या प्रतिनिधीला देऊ नये. बँक संदर्भात कोणताही व्यक्ती महास्वराज्य व्यापारचा प्रतिनिधी किंवा भाग आहे असे सांगुन माहिती तुमच्याकडून मागत असेल तर त्यांना ती देऊ नये, अश्या लोकांची माहिती महास्वराज्य व्यापारच्या सहाय्यक (सपोर्ट) टीमला कळवावी.
- नोंदणी करताना सादर केलेली माहिती किवा कागदपत्रे इ. पडताळणी करते वेळी खोटे/ चुकीचे आढळुन आल्यास तो अकाऊंट बाद करण्याचे सर्व अधिकार हे महास्वराज्य व्यापारच्या प्रशासक टीम कडे असतील. तसेच नोंदणी दाराने सादर केलेली माहिती ही अटी व नियम बाह्य असल्यास तो अर्ज नाकारला जाईल याची नोंद घ्यावी.
- नोंदणीदाराने संपूर्ण माहिती भरून झाल्यावर त्याला पहिला १५ अंकी अर्ज संदर्भ क्रमांक (ARN – Application Reference Number) दिला जाईल. हा ARN नोंदणीदाराने महास्वराज्यद्वारे वैध तपासणी होई पर्यत स्वतःकडे लिहून अथवा जतन करुन ठेवणे गरजेचे आहे.
- नोंदणीदाराला ARN प्राप्त झाल्यापासून पुढील २ ते ३ कामाच्या दिवसात (साप्ताहिक सुट्टी वगळून) नोंदणीदार व त्याने केलेला अर्ज हा महास्वराज्यच्या अधिकृत प्रशासक संघ (टीम) कडून पडताळून पहिला जाईल व नेमुन दिलेल्या अटी आणि नियमांनुसार सदर अर्ज मंजूर अथवा नाकारले जाईल.
- नोंदणीदाराने सादर केलेल्या अर्जाची स्थिती (स्टेटस) पाहण्यासाठी मुख्य पृष्ठ (होम पेज) वरील अँप्लिकेशन स्टेटस (Applcation Status) या बटन वर क्लीक करून पुढील माहिती भरून नोंदणीदार पाहू शकेल.
- नोदणीदाराचा अर्ज महास्वराज्य प्रशासक संघ (टीम) मार्फत मंजूर झाल्यावर एप्लीकेशन स्टेटस मध्ये नोंदणीदाराला एक युनिक १४ अंकी महास्वराज्य ओळख क्रमांक ( MSIN – MahaSwarajya Indentification Number ) दिला जाईल. हा MSIN नंबर नोंदणीदाराने स्वतःकडे लिहून अथवा जतन करुन ठेवावे. महास्वराज्य ओळख क्रमांक हा महाराष्ट्रातील नोंदणीकृत मराठी ग्राहक/ वापरकर्ता / व्यावसायिक म्हणून ओळखला जाईल.
- नोंदणीदाराला MSIN नंबर मिळाल्यानंतरच तो महास्वराज्य ओळख पोर्टल (olakh.mahaswarajya.com) वर यशस्वीरीत्या प्रवेश करू शकतो व तिथे नोंदणीदाराला महास्वराज्य व्यापर च्या वापरासाठी युजरनेम आणि तात्पुरता पासवर्ड उपलब्ध करुन दिला जाईल.
- नोंदणीदार महास्वराज्य ओळख पोर्टल मधे असलेल्या महास्वराज्य व्यापार या विभाग मध्ये जाऊन लॉग-इन टू महास्वराज्य व्यापार या बटनावर क्लिक करुन किंवा व्यापार•महास्वराज्य•कॉम (vyapar.mahaswarajya.com) या ऑनलाइन संकेत स्थळावर जाऊन यशस्वीरित्या प्रवेश करु शकतो.
- पहिल्यांदा महास्वराज्य व्यापार — व्यापार•महास्वराज्य•कॉम ( vyapar.mahaswarajya.com ) वर दिलेल्या युजरनेम आणि तात्पुरता पासवर्ड वापरून प्रवेश केल्यावर आम्ही आपल्याला तात्पुरता पासवर्ड बदलून नविन पासवर्ड समाविष्ट/ अद्यावत (अपडेट) करण्यास सुचवतो. नविन पासवर्ड समाविष्ट/ अद्यावत (अपडेट) करणे हे गरजेचे आहे व वापरकर्त्याने नविन पासवर्ड स्वतः पुरता गोपनीय ठेवणे बंधनकारक आहे.
वरील नमूद केलेली सर्व प्रकिया ही सर्व प्रकारच्या मराठी ग्राहक / वापरकर्ता / व्यावसायिक/ स्थानिक प्रतिनिधी यांच्या नोंदणीसाठी सारखीच असेल.
- सामान्य ग्राहक किंवा वापरकर्ता यांच्यासाठी :-
- जर आपण सामान्य ग्राहक किंवा वापरकर्ता असाल तर आपल्याला पुढे काहीच करायची गरज नाही. आपण आपल्या मराठी बांधवांचे व्यवसाय महास्वराज्य व्यापारवर शोधू शकता तसेच ज्या नविन शहरात जाल तेथे सुद्धा महास्वराज्य व्यापारच्या मदतीने तेथील मराठी व्यवसाय सहजपणे शोधून त्यांचा व्यवसाय वाढविण्यास हातभार लावु शकता. त्यासाठी तुम्हाला महास्वराज्य व्यापार मध्ये यशस्वीरीत्या प्रवेश करणे बंधनकारक असेल.
- व्यवसाय किंवा स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी :-
- जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय किंवा स्वयंरोजगार करत असाल तर आपण आपला व्यवसाय व व्यवसायाची माहिती महास्वराज्य व्यापार मार्फत आपल्या मराठी ग्राहकांपर्यंत पोहोचाविण्यासाठी खालील पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे.
- व्यवसाय नोंदणीसाठी पहिल्यांदा आपल्याकडे महास्वराज्य ओळख क्रमांक ( MSIN – MahaSwarajya Identification Number ) असणे आवश्यक आहे. जर MSIN नंबर नसल्यास वरील दिलेल्या माहिती प्रमाणे नोंदणी करुन मगच पुढील प्रमाणे व्यवसाय नोंदणी करावी.
- व्यवसाय नोंदणीसाठी आपण महास्वराज्य व्यापार मध्ये यशस्वीरित्या प्रवेश (लॉग-इन) करणे बंधनकारक आहे. लॉग-इन केल्यावर वेबपेजच्या वरील बाजूस उजव्या कोपऱ्यात ऍड लिस्टिंग (Add Listing ) बटन वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या व्यवसायचा प्रकार, व्याप्ती, तसेच आवश्यकतेनुसार आणि आपल्या आर्थिक सोयी नुसार दिलेल्या योजना व त्यामधे असणाऱ्या सेवांचा तपशील पाहूनच आपण योग्य ती इच्छित एक योजना व निवडू शकता.
- इच्छित योजना (प्लान/plan) व त्याची किमतीची खात्री करुन मगच योजना निवडण्यासाठी चूज प्लान (choose plan) या बटन वर क्लिक करावे. योजनेची निवड झाल्यावर पुन्हा योजना बदलता येणार नाही.
- त्यानंतर आपल्या व्यवसाय बद्दलची काही वैकल्पिक (optional) माहिती वगळता इतर सर्व माहिती देणे बंधनकारक आहे. तसेच आपल्या व्यवसायाचा पत्ता व गूगल मॅप लोकेशन (google map location) अचूक देणे बंधनकारक असेल. त्यासाठी ड्रॉप पिन (drop pin) या बटनावर क्लिक करुन मॅप उपलब्ध केलेला आहे.
- पुढे आपल्या व्यवसायाची खरी माहिती व्यवसायाचा नाव, संपूर्ण पत्ता, शहर, दूरध्वनी क्रमांक, व्यवसायाचा प्रकार, किंमत तपशील, कामकाजाची वेळ, सोशल मिडिया लिंक (असतील तर), नेहमी विचारले जाणारे प्रश्न, व्यवसायाचे वर्णन, फोटो, लोगो (सॉफ्टकॉपी / फोटो ) आणि सर्वात महत्वाचा महास्वराज्य ओळख क्रमांक ( MSIN – MahaSwarajya Identification Number ) इत्यादि माहिती डिजिटल स्वरूपात भरावयाची आहे.
- माहिती भरून झाल्यावर आमच्या गोपनिता धोरणास (Privacy Policy) आपली संमती देण्यासाठी (I Agree) समोरील चौकोनात टिक करणे बंधनकारक आहे. आमच्या गोपनीय धोरणास आपली संमती नसल्यास आपण महास्वराज्य व्यापारात नोंदणी करु नये असे आम्ही सुचवितो.
- संमती दिल्यानंतर खालील सेव एंड प्रीव्यू (SAVE & Preview) बटन कार्यरत झाल्यावर त्यावर क्लिक करुन व्यवसायाची माहिती जतन करुन ठेवली जाईल व तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा माहिती दर्शक पेज दिसेल. हा पेज महास्वराज्य व्यापारच्या प्रशासक टीम कडून पडताळणी व प्रकाशित ( Verify & Publish ) होई पर्यंत फक्त एकट्या तुम्हालाच पाहता येईल.
- पडताळणी व प्रकाशित होण्याआधी जर आपण देय योजना (Paid plan/ किमत असलेली) निवडलेली असेल तर आपणास ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करने बंधनकारक असेल. त्यासाठी खालील उजव्या बाजुस दिलेल्या पे एंड पब्लिश (Pay & Publish) या बटनावर क्लिक करुन पुढे आपला व्यवसाय निवडून नंतर दिलेल्या पेमेंट गेटवे पैकी एक निवडून योजना व भरावयाची एकूण रक्कम तपासून खात्रीपुर्वक संपूर्ण पेमेंट प्रक्रिया करणे बंधनकारक असेल.
- पेमेंट प्रक्रिया करतेवेळी सवाधानतेने निवडलेल्या योजनेची किंमत खात्री करुनच पुढील प्रक्रिया करावी. ऑनलाइन पेमेंट पद्धत व प्रक्रिया ही भारत सरकार व RBI प्रमाणित नामांकित कंपनीच्या अंतर्गत असलेले अती सुरक्षित पेमेंट गेटवे (Highly Secure Payment Gateway ) महास्वराज्य व्यापरला जोडले असल्याने आपले बँकिंग पेमेंट ( पैश्याचे ऑनलाइन व्यवहार) प्रक्रिया सुरक्षित आहे याची नोंद घ्यावी.
- तुम्ही निवडलेल्या योजनेची पेमेंट प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर पुढील २ ते ३ कामाकाजच्या दिवसात महास्वराज्य व्यापारच्या प्रशासक टीम कडून व्यवसाय पडताळणी, पेमेंट पडताळणी व प्रकाशित ( verify & publish ) केले जाईल.
- जर आपण महास्वराज्य व्यापार व्यवसाय योजनेतील मोफत असणारी योजना निवडल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारची किंमत (पेमेंट) महास्वराज्य व्यापारला द्यावी लागणार नाही याची नोंद घ्यावी.
- महास्वराज्य व्यापारच्या प्रशासक टीम कडून आपला व्यवसाय प्रकाशित (Publish) झाल्यावर येथे व्यवसाय नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होते व आपला व्यवसाय महास्वराज्य व्यापार निर्देशिकेत प्रकाशित केला जातो व सर्व मराठी ग्राहकास / वापरकर्त्यास तो दाखविला जातो.
- व्यवसाय नोंदणी प्रक्रिया बद्दल अधिक सविस्तर फोटो दर्शक माहिती साठी या यूजर गाईड वर क्लिक करा.
- स्थानिक प्रतिनिधी (Local Volunteer) नोंदणीसाठी :-
- ज्या महाराष्ट्रीयन मराठी व्यक्तीस महास्वराज्य व्यापार या उपक्रमात स्थानिक प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल त्यानी महास्वराज्य ओळख पोर्टल (olakh.mahaswarajya.com ) वर नोंदणी करुन महास्वराज्य ओळख क्रमांक ( MSIN – MahaSwarajya Indentification Number ) मिळविणे आवश्यक आहे.
- स्थानिक प्रतिनिधीसाठी स्वतःचा संगणक (कंप्युटर/ लॅपटॉप ) तसेच इंटरनेट सेवा जोडलेली असणे बंधनकारक आहे.
- महास्वराज्य ओळख क्रमांक ( MSIN ) मिळाल्यानंतर आपले नाव, जिल्हा, तालुका, MSIN, आम्हाला support@vyapar.mahaswarajya.com वर ईमेल करणे बंधनकारक असेल.
- आम्हाला तुमचा ईमेल मिळाल्या नंतर पुढील २ ते ३ कामाकाजच्या दिवसात महास्वराज्य व्यापारच्या प्रशासक टीम कडून आपल्याशी संपर्क साधला जाईल व आपल्याला पुढील मार्गदर्शन केले जाईल.